esakal | Political : शिवसेनेत शांतता, मात्र वादळापूर्वीची !
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेत शांतता, मात्र वादळापूर्वीची!

सोलापूरच्या राजकरणात सध्या मोठ्या उलथापालथी सुरू आहेत. सर्व पक्षांचे राजकीय फड गाजू लागले आहेत.

शिवसेनेत शांतता, मात्र वादळापूर्वीची!

sakal_logo
By
अरविंद मोटे

सोलापूर : सोलापूरच्या (Solapur) राजकरणात सध्या मोठ्या उलथापालथी सुरू आहेत. सर्व पक्षांचे राजकीय फड गाजू लागले आहेत. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आघाडीवर आहे. खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोलापुरात येऊन कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. एवढेच नाही, तर पुढील तीन महिने ते सोलापूरला दर महिन्याला येणार आहेत. कॉंग्रेसमध्ये (Congress) जिल्हाध्यक्षांच्या नव्या निवडीने नवचैतन्य निर्माण झाले आहे. सध्या जिल्हाभर नेमणुका, बैठकांचा सपाटा सुरू आहे. मात्र, शिवसेनेत (Shivsena) शांतता आहे; मात्र ती वादळापूर्वीची असावी, असा कयास राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

हेही वाचा: अण्णा दावल ती दिशा 'पूर्व', तरीबी कात्रजच्या घाटाची भीती!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने सोलापुरात संपर्क अभियान सुरू करून शिवसेनेने निवडणुकीच्या खूप पूर्वीच वातावरण निर्मितीत आघाडी घेतली होती. सोलापूर महापालिकेत दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेला तेव्हा अजून कोणीही अखेरचा "जय महाराष्ट्र' केलेला नव्हता. मात्र, फुटीची लक्षणे तेव्हाही होती. माजी महापौर महेश कोठे, माजी आमदार दिलीप माने हे राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत तेव्हाही होतेच. त्यामुळे काही तरी घडामोडी होणार हे नक्की होते. फुटीचे ढग गडद होत होते, अशा काळातच शिवसेनेने सर्व ताकद लावून संपर्क अभियान यशस्वी केले. बूथवाईज, गटवाईज मेळावे घेतले. यामुळे निवडणुकीपूर्वीच राजकीय रंग भरण्यास सुरवात झाली होती. दरम्यान, अंतर्गत कलहातून झालेल्या काही घटनांमुळे संपर्क अभियानाने झालेली वातावरण निर्मिती गढूळ झाली.

आता, महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. कोठे आणि परिवारातील आठ ते दहा नगरसेवक शिवसेना सोडून जाऊ शकतात, हे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. मात्र, कॉंग्रेसला शेवटपर्यंत अंधारात ठेवत, अनेक माजी महापौर व दिग्गजांची साखळी कोठे यांनी राष्ट्रवादीकडे ओढली आहे. कोठे यांनी त्यांच्या जुन्या घरातून एवढी माणसे फोडली आहेत; मग राहत्या घरातून किती फोडली जातील याचा अंदाज अजूनही शिवसेनेलाही आलेला नाही. यामुळे शिवसेनेत शांतता दिसत आहे.

हेही वाचा: कोण आहे पवारांच्या डोक्‍यातील विधानपरिषद निवडणुकीसाठीचा उमेदवार?

तरीही शिवसेनेने नुकतीच एक बैठक सेना भवनात घेतली. जुन्या- नव्यांची मोट बांधून "डॅमेज कंट्रोल'साठी मूठ आवळली आहे. या वादळात कोठेंच्या गळाला कोणी लागू शकते का, अजून कोणी जाईल का, याची चाचपणी सुरू आहे. फूट रोखण्यासाठी शिवसेनेतून प्रयत्नांचे शिकस्त सुरू आहे. नेहमीप्रमाणे "उडाले ते कावळे राहिले ते मावळे' म्हणत पुन्हा नव्या बांधणीनिशी शिवसेना निवडणुकीसाठी सज्ज होतेय. सध्या शिवसेना शांत आहे; मात्र ती शांतता ही फक्त वादळापूर्वीची आहे.

loading image
go to top