'या' तालुक्यात हजारो हेक्टर मधील डाळिंबाच्या बागा सापडल्या तेल्या रोगाच्या संकटात

telya dalimb.png
telya dalimb.png

सांगोला(सोलापूर)ः दिवसा पडणारे कडक ऊन, ढगाळ हवामान व अधून-मधून पडणारा पाऊस या सध्याच्या लहरी हवामानामुळे सांगोला तालुक्‍यातील बहार धरलेल्या डाळिंब बागांवर तेल्या रोगाचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांनी रोगट डाळिंब काढून त्याचे ढिग शेतामध्ये लावले आहे. या रोगाचा मोठा आर्थिक फटका डाळिंब उत्पादकांना बसला आहे. 

सांगोला तालुक्‍यात डाळिंबाच्या माध्यमातून मोठी कृषी क्रांती झाली आहे. डाळिंबाचे आगार म्हणून नावारूपाला आलेला सांगोला तालुक्‍यात 25 हजार हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र हे डाळिंबाचे आहे. यावर्षी लॉकडाउनच्या काळात बागेतील परिपक्व झालेले फळे नेण्याकरिता व्यापारी सुद्धा मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने डाळिंबाची विक्री केली. 

सध्या उन्हाळ्यात बहार धरलेल्या डाळिंब बागांवर सध्याच्या वातावरणामुळे तेल्या रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. सध्याच्या वातावरणात कडक पडणारे ऊन, अधून मधून ढगाळ वातावरणात अचानक पडणारा पावसाने डाळिंबावर इतर रोगांबरोबरच तेल्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने रोगट झालेली डाळिंब शेतकरी तोडुन टाकीत आहेत. त्यामुळे तेल्यांचे रोगट डाळिंबांचे ढिग ागलेले अनेक ठिकाणी दिसुन येत आहे. 


उत्पन्न कमी व खर्च जास्त 
डाळिंबावर पडणाऱ्या नवनवीन रोगांमुळे शेतकऱ्यांना फवारणीसाठी औषधांचा मोठा खर्च येत आहे. तेल्यासारखा रोग आल्यास यावर हमखास असे औषध नसल्याने विविध प्रकारचे उपायोजना करण्यासाठी शेतकरी वाढीव खर्च करतो. परंतु त्यामानाने डाळिंबाला भाव मिळत नाही. सद्यपरिस्थितीत हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखले जाणारे डाळिंब बागांवरील खर्च वाढत आहे. मात्र खर्चाएवढेही उत्पन्न मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

कोरोना आणि तेल्याचे दुहेरी संकट 
सध्याच्या वातावरणात बसलेल्या डाळिंबावर मोठ्या प्रमाणात तेल्या रोग आला आहे. कडक ऊन तसेच यावर्षी सुरुवातीपासूनच सुरू झालेल्या पावसाने तेल्या रोगाचे प्रमाण वाढले आहे. तेल्या रोगाची रोगट डाळिंब कामगारांकडून तोडून घ्यावी लागत आहे. एकीकडे कोरोनाचे संकटामुळे डाळिंबाला भाव मिळाला नाही तर दुसरीकडे सध्या तेल्याने बागांचे नुकसान झाले आहे. शासनाने याकडे लक्ष देवून मदत करावी 
- किरण खंडागळे, डाळिंब उत्पादक शेतकरी.  

 
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com