
सोलापूर : येथील सेवासदन शाळेच्या कंपाऊंडलगत असलेल्या बोळातून पांढऱ्या रंगाच्या पिशवीतून गांजा घेऊन जाणाऱ्या तिघांना फौजदार चावडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडले. त्यात एक सोलापुरातील तर दोघेजण परराज्यातील आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एक लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.