
खेळत खेळत शेततळ्याकडे गेलेल्या तीन चिमुकल्यांचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार ता. 9 रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास शेटफळ ता. मोहोळ येथे घडली.
'शेततळ्यात पडुन तिघा चिमुकल्यांचा मृत्यु
मोहोळ - खेळत खेळत शेततळ्याकडे गेलेल्या तीन चिमुकल्यांचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार ता. 9 रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास शेटफळ ता. मोहोळ येथे घडली. विनायक भरत निकम वय-11, सिद्धार्थ भरत निकम वय-8, दोघे रा. माचणूर तर कार्तिक मुकेश हिंगमिरे रा. शेटफळ वय-5 अशी मृत्यु झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.
मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत सिद्धार्थ व विनायक यांचे वडील भरत निकम हे मजुरीसाठी शेटफळ येथे आले आहेत. ते सकाळी मजुरीसाठी दुसऱ्याच्या शेतात गेले होते. तर कार्तिक हा त्या दोघांचा मित्र होता. तिघेही खेळत घराकडे जात होते, रस्त्यातच शेततळे होते तिघेही शेततळ्याकडे गेल्यानंतर त्यात पडून तिघांचाही मृत्यू झाला. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात झाली आहे. अधिक तपास हवलदार आदलिंगे करीत आहेत.
Web Title: Three Childrens Death Drown In Farm Lake
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..