
मोहोळ : शेटफळ (ता. मोहोळ) येथील मनोज डंके मृत्युप्रकरणी महावितरणच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. महावितरणचे सोलापूर ग्रामीणचे कार्यकारी अभियंता रमेश राठोड, मोहोळ येथील सहाय्यक अभियंता राजकुमार कलशेट्टी व शेटफळ येथील कनिष्ठ सहाय्यक अभियंता पुरुषोत्तम ढेरे, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.