police officer suspended
sakal
करमाळा - पोलीस कोठडीत असताना स्वतःला जखमी करून घेतलेल्या कृष्णा ज्ञानदेव मोहिते (वय-३८, रा. सांगवी) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकासह (पीएसआय) दोन पोलीस कॉन्स्टेबल अशा तिघांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत सुरू असून, तपास अधिकाऱ्यांच्या शिफारशीनंतर वरिष्ठांनी ही कारवाई केल्याचे समजते.