सोलापूर जिल्ह्यात स्वागत कमान कोसळून तीन कामगार ठार

Three workers killed in Solapur district
Three workers killed in Solapur district
Updated on

बार्शी (जि. सोलापूर) : बार्शी-तुळजापूर रस्त्यावर बार्शीपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या बावी (आ) (ता. बार्शी) येथे बांधकाम सुरू असलेल्या प्रवेशद्वाराची स्वागत कमानी कोसळून तीन कामगार जागीच ठार झाले आहेत. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 

महेश भारत डोळस (वय 27, रा. वैराग), विकास सुग्रीव वाळके (वय 32, रा. मानेगाव), दीपक संभाजी घोलप (वय 32, रा. दडशिंगे) अशी मृत्यू पावलेल्या कामगारांची नावे आहेत. बार्शी-तुळजापूर रस्त्यावर बावी हे गाव आहे. येथे सुमारे पाच लाख रुपये खर्चून स्वागत कमानीचे काम सुरू आहे. रस्त्याच्या दोन बाजूला स्वागत कमानीच्या सुमारे 25 फूट उंचीच्या प्रत्येकी दोन पिलरचे स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. चार मजूर कामगार स्लॅब भरत होते, तर एकूण नऊ मजूर कामगार कामावर होते. कमानीवरील एक कामगार पाणी पिण्यास खाली उतरला असताना ही कमान कोसळली. या वेळी कमानीवर स्लॅब भरणाऱ्या तीनही कामगारांच्या अंगावर स्लॅब कोसळल्याने ते पूर्णपणे दबून गेले होते. अंगावर सर्व सिमेंट व खडीचा ढिगारा पडला होता. हा ढिगारा बाजूला घेईपर्यंत कामगारांनी श्‍वास सोडला. तालुका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाजूला काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why did Rohini Paradhye die by end life
Woman and Two-Year-Old Child Die by Suicide in Maharashtra Village, Family Shocked
solapur city
sarpanch reservation announce
Marathi News Esakal
www.esakal.com