esakal | लॉकडाऊनच्या नावाखाली जुगाराने धरला जोर 
sakal

बोलून बातमी शोधा

The thrust of gambling under the name of Timepass

कारवाईची गरज 
सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताहेत. असे असतानाही अनेकांना गांभीर्य नाही. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. 
- सोमनाथ झिंजाडे, ग्रामस्थ, पोथरे 

लॉकडाऊनच्या नावाखाली जुगाराने धरला जोर 

sakal_logo
By
नानासाहेब पठाडे

पोथरे (ता. करमाळा, जि. सोलापूर) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू केली आहे. जमाव रोखण्यासाठी पोलिस रात्रंदिवस झटत आहेत. असे असतानाही खेड्यात मात्र याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. खेड्यात रस्त्यावर फिरू देत नाहीत म्हणून शेतात, झाडाखाली, स्मशानभूमीत निवांत ठिकाणी 20-25 जण एकत्र येऊन जुगार खेळत आहेत. टाइमपासच्या नावाखाली जुगार खेळाने मोठा जोर धरला आहे. यात पुणे, मुंबईहून आलेल्यांची संख्या जास्त असल्याने संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. 
करमाळा तालुक्‍यातील पोथरे, जातेगाव, आळजापूर, करंजे परिसरात आपला गावच बरा म्हणत पुणे, मुंबईहून प्रत्येक गावात 100 ते 200 नागरिक आले आहेत. एवढ्यावर न थांबता सकाळी 10 वाजता आपले जेवण आटपून गावाशेजारील शेतात जाऊन 20-25 जण एकत्र जमत आहेत व जुगार खेळत आहेत. काहीजण तर चक्क स्मशानभूमीतच जावून जुगार खेळत आहेत. 
जमावबंदी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने संचारबंदीसोबतच प्रत्येक गावात आपत्ती व्यवस्थापन समितीची नेमणूक केली आहे. तरी देखील प्रत्येक गावात चार ते पाच ठिकाणी 20 ते 25 जण एकत्र जमून जुगार खेळत आहेत. आपत्ती व्यवस्थापन समिती या बाबींवर सहजासहजी आळा घालू शकते. टाइमपासच्या नावाखाली एकत्र येणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 
दरम्यान, जुगाराबरोबरच अनेक ठिकाणी व्यसनही केले जात आहे. नियमबाह्य वागणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जातेगाव येथील तुषार शिंदे यांनी केली.