Solapur News : शनिवारी पहाटे वाघाने या वासरावर हल्ला केला. सकाळी उठल्यानंतर हगवणे यांनी वासरू ठार झाल्याचे पाहिले आणि तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली.
पांगरी : येडशी अभयारण्यातील वाघाचे पाळीव जनावरांवर हल्ल्याचे सत्र सुरूच असून, शनिवारी पहाटे बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथे वाघाने केलेल्या हल्ल्यात वासरू ठार झाले. ही घटना सकाळी सहा वाजता उघडकीस आली.