
पांगरी : येडशी वन्यजीव अभयारण्यातील वाघाचा वावर पुन्हा एकदा ढेंबरेवाडी शिवारात आढळून आला आहे. दोन ट्रॅप कॅमेऱ्यात त्याचे स्पष्ट दर्शन झाले असून, मृत गायीच्या ठिकाणी तो परत येईल, या अपेक्षेने बसवलेल्या कॅमेऱ्यात त्याची हालचाल कैद झाली. मात्र, माणसाचा वास लागल्याने सावधगिरी बाळगत वाघाने मृत गायीपासून दहा मीटर अंतरावर माघार घेतल्याचे दिसून आले.