
पांगरी : येडशी अभयारण्यातून बाहेर पडलेला आणि गेल्या दोन- अडीच महिन्यांपासून धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा वाघ अखेर पुन्हा अभयारण्यात परतला आहे. तुळजापूर तालुक्यातील कामठा परिसरातून तो दोन दिवसांपूर्वी येडशी अभयारण्याच्या हद्दीत दाखल झाला. रेस्क्यू पथकाने सतत त्याचा मागोवा घेतला, मात्र वाघाने हुलकावणी देत बाहेर पडून पुन्हा अभयारण्यात प्रवेश केला आहे.