Solapur : भूम तालुक्यातील सुटका परिसरात वाघोबाचे दर्शन; वनविभागाची तत्काळ धाव; पावलांच्या ठशांवरून माग
वडजी (ता. भूम) येथे वासरावर हल्ला केल्यानंतर तब्बल चार दिवसांनंतर गुरुवारी रात्री एक वाजता सुटका परिसरातील तलावाजवळ एका नागरिकाने वाघ रस्त्यावरून जाताना पाहिला. काही वेळ वाघोबा रस्त्यावर थांबल्यानंतर तो तलावाच्या दिशेने निघून गेला.
Forest department officials tracking the footprints of a tiger spotted in the Suktapada area of Bhum Taluka.Sakal
पांगरी : भूम तालुक्यातील सुटका गावाच्या परिसरातील तलावाजवळील रस्त्यावर मध्यरात्री वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या परिसरात वाघाच्या पावलांचे ठसे आणि त्याच्या हालचाली दिसून आल्या आहेत.