
पांगरी : येडशी अभयारण्य परिसरात वाघाच्या वावराने परिसरात दहशत कायम आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता वाघ बार्शी-लातूर रस्ता ओलांडून कोक तलावाच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून येडशीला निघालेल्या रामप्रभू ढेंबरे यांच्यासह अन्य व्यक्तींना ८० ते १०० फूट अंतरावर वाघाचे पुन्हा दर्शन झाले.