
पांगरी : गेल्या दहा दिवसांपासून येडशी अभयारण्यातून बाहेर पडलेला वाघ पुन्हा अभयारण्याच्या दिशेने परतत असताना रविवारी पहाटे वाघाने ढेंबरेवाडी (ता. बार्शी) शिवारात गाईवर हल्ला करून तिला ठार केले. त्यानंतर पहाटे पाच वाजता वाघ ढेंबरेवाडी तलावाजवळ लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला आहे.