सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूवर शेळ्या राखण्याची वेळ : वाल्मिक मानेंनी मिळवला होता देशात चौथा क्रमांक 

KMT21B00241.jpg
KMT21B00241.jpg

कोरवली (.सोलापूर ): देशपातळीवर कुस्तीचे मैदान मारून सुवर्णपदक मिळवलेल्या हराळवाडी (ता. मोहोळ) येथील कुस्तीपटूवर आज शेळ्या राखून संसाराचा गाडा चालविण्याची वेळ आली आहे. देशपातळीवर गावाचे आणि जिल्ह्याचे नाव गजविणारा हा कुस्तीपटू हलाखीचे जीवन जगत असताना त्याला मदत करण्यासाठी न सरकार आले आहे, ना दानशूर व्यक्ती. 

हराळवाडी (ता. मोहोळ) येथील कुस्तीपटू वाल्मिक माने यांनी 1979 साली शिमला येथे झालेल्या रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या कुस्ती स्पर्धेत देशपातळीवर चौथा क्रमांक पटकावला होता. तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या स्पर्धेत राज्य पातळीवर सुवर्णपदक पटकावले होते. पण काळाच्या ओघात माने यांच्यावर हालाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. गावाकडे शेळ्या राखून घर चालवण्याची वेळ त्यांच्या आली आहे. त्यांना शासनाकडून मानधन सुरू करण्याची मागणी होत आहे. 

65 वर्षीय वाल्मिक माने यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले, की मी गावातील टेलरकडून लंगोटा शिवून घेतला आणि गावच्या तालमीत कुस्तीसाठी पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर गावोगावी यात्रांमध्ये कुस्त्या मारत सुटलो. पुढे सोलापूरच्या पत्रातालमीत मेहनत करून अनेक मैदाने मारली. राज्य आणि देशपातळीवर अनेक कुस्ती स्पर्धा खेळल्या व अनेक पदकं मिळवली. सोलापूरच्या सिद्धेश्वर आखाड्यातही मी लढलो आहे. एकनाथ धोडमिसे हे आमचे वस्ताद होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी राज्य व देश पातळीवर कुस्ती खेळलो. पण सध्या संसाराचा गाडा ओढण्यासाठी मला रानात शेळ्या राखून जीवन जगावे लागत आहे. तरुणांना कुस्तीचे प्रशिक्षण देण्याची खूप आवड आहे. हराळवाडीत शासनाने सुविधा उपलब्ध करून दिली. तर तरुणांना कुस्तीचे प्रशिक्षण देण्याची माझी तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय पातळीवर गावचे नावलौकिक केलेल्या माने यांना पेन्शन सुरू करण्यासाठी गावातील सरपंच व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. 

संपादन : अरविंद मोटे  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com