Rajan Patil : मोहोळ तालुक्याचा दुष्काळ हटविण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला ज्यादा मताधिक्य देण्याचा निर्धार - राजन पाटील

मोहोळ तालुक्यातील दुष्काळ हटविण्यासाठी सीना,भीमा नदीवर बंधारे, सीना भोगावती जोड कालवा , कृष्णा भीमा स्थिरीकरण तसेच अनगर व दहा गावे पाणी पुरवठा या सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाजप सकारात्मक आहे.
Rajan Patil
Rajan PatilSakal

Mohol News : सोलापूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, सर्व सेलचे कार्यकर्ते यांची महत्त्वाची बैठक मंगळवार ता 30 रोजी माजी आमदार माजी राजन पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

या प्रसंगी आमदार यशवंत माने, युवा नेते अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांच्या सह तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार राजन पाटील म्हणाले, मोहोळ तालुक्यातील दुष्काळ हटविण्यासाठी सीना,भीमा नदीवर बंधारे, सीना भोगावती जोड कालवा ,

कृष्णा भीमा स्थिरीकरण तसेच अनगर व दहा गावे पाणी पुरवठा या सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाजप सकारात्मक आहे. आपल्या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न यामुळे सुटणार असल्याने आपण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना जादा मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी बालाजी साठे,मदन पाटील, सोमनाथ दावणे आदींनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माऊली जाधव यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांनी मानले. या प्रसंगी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते,नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com