रेवणसिध्देश्‍वर मंदिर परिसरात दिसली मगर ! वन विभाग उद्या घेणार शोध; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तीन कर्मचारी

42magar_5_0.jpg
42magar_5_0.jpg
Updated on: 

सोलापूर : महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयाजवळील रेवणसिध्देश्‍वर मंदिर परिसरात आज सायंकाळी सातच्या सुमारास मगर आढळली. चार फुटाची मगर असून धर्मवीर संभाजीराजे तलावाशेजारील डबक्‍यात ती मगर गेली आहे. त्याठिकाणी 24 तास खडा पहारा लावण्यात आला असून त्यासाठी तीन शिफ्टमध्ये प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांची नियुक्‍त करण्यात आली आहे.

मगर ही 'शेड्यूल-वन'मध्ये येते 
वन्यजीव संरक्षक अधिनियमानुसार बिबट्या, वाघ, सिंह, काळवीट, कासव, नाग, मगर असे प्राणी शेड्यूल- वनमध्ये येतात. ज्या प्राण्यांची संख्या कमी झाली आहे, त्यांना वाचविणे, त्यांचे सरंक्षण करणे काळाची गरज आहे, अशांचा समावेश शेड्यूल-वनमध्ये केला जातो. अशा प्राण्यांना पकडणे अथवा ठार मारण्यासाठी विविध टप्प्यांवर कागदांची शर्यत पार करावी लागते. या प्राण्यांना विनापरवाना, बेकायदेशीर त्रास देणाऱ्यांना अथवा ठार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाते. नामशेष होत असलेल्या प्राणी, पक्षांचे जतन करताना वन विभागाकडून त्याची खबरदारी घेतली जाते, असेही शेख यांनी यावेळी सांगितले.

देगाव येथील ओढ्यातील मगर पकडल्यानंतर त्या परिसरातील नागरिक निश्‍चिंत झाले होते. आता काही दिवसांनंतर पुन्हा प्राणिसंग्रहालयाजवळच मगर आढळली असून यापूर्वीही अशीच एक मगर त्या परिसरात आढळली होती. मगरीची लांबी चार फुटांपर्यंत असून मगर सुरक्षित आहे. तिच्यापासून नागरिकांना कोणताही धोका होऊ नये म्हणून वन विभागाने खबरदारी घेतली आहे. मगर सुरक्षित राहावी, याचीही काळजी घेतली जात आहे. वन विभागाचे एक पथक उद्या (गुरुवारी) त्या मगरीचा शोध घेणार आहे. तत्पूर्वी, मगरीला पकडण्यासाठी वरिष्ठ स्तरावरुन परवानगी घेतली जाईल, असे वन अधिकारी इर्शाद शेख यांनी सांगितले. मगर पडकल्यानंतर त्याचठिकाणी प्राणिसंग्रहालयात सोडायची की दुसरीकडे सोडायची हे वरिष्ठ पातळीवरुनच निश्‍चित होईल, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले. तत्पूर्वी, मगर दिसल्यानंतर घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी पोहचले. त्यांनी परिसराची पाहणी केली असून मगर असल्याचे निश्‍चित झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Division Teachers Constituency
Drought Relief for Maharashtra Farmers Limited to Two Hectares as Officials Survey Crop Damage Across 265 Talukas
Global Recording of 'Chrysilla Volup' in Madha College Campus; Major Milestone in Biological Research
Maharashtra Drought Crisis Hits Pandharpur as Three Month Rain Break Threatens Rabi Season and Farmer Livelihoods
Marathi News Esakal
www.esakal.com