
पंढरपूर : श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे सुलभ व वेळेत दर्शन व्हावे, यासाठी तिरुपती व शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर टोकन दर्शन पद्धती राबविण्यासाठी आवश्यक संगणक प्रणाली विकसित करून देण्याबाबत टीसीएस कंपनीला प्रस्ताव देण्यात आला होता. त्यावर या कंपनीने मोफत संगणक प्रणाली विकसित करून देण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.