
सोलापूर : ‘ओ टमाटे घ्या हो दहा रुपये किलो, फ्लावर घ्या हो वीस रुपयाला गड्डा, मेथी घ्या हो दहाला दोन’ अशी आरोळी नवीन नाही. मात्र ऐन धर्मवीर संभाजी तलावाशेजारी रेल्वे पुलावर सायंकाळच्या वेळी रिक्षा उभा करून स्वस्त भाजीपाला विक्री सुरू असते. एके दिवशी हा स्वस्तातील भाजीपाला महागात पडणार आहे. अपघाताला निमंत्रण देणारी ही भाजी विक्री कुणाचा तरी जीव घेऊ शकते.