snehal dhargude
sakal
मोहोळ - कामती बुद्रुक, ता. मोहोळ येथील एका वस्तीगृहातील अठरा वर्षीय विद्यार्थिनीने शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता वस्तीगृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. कु. स्नेहल प्रदीप धरगुडे, रा. गोटेवाडी, ता. मोहोळ असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेची अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे.