
सांगोला : अज्ञात कारणावरून एका २२ वर्षीय तरुणाने घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कराडवाडी कोळा (ता. सांगोला) येथे घडली आहे. वैभव तानाजी आलदर (वय २२ वर्षे, रा. कराडवाडी, कोळा, ता. सांगोला) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.