
सोलापूर : भरधाव डंपरने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात तिघे जागीच ठार झाले. मंगळवारी (ता. २४) सकाळी ९.४५ च्या सुमारास मुस्ती - धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) रस्त्यावर हा अपघात घडला. तिघेही मुस्ती येथील असून बांधकाम कामगार म्हणून काम करत होते. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याने मुस्ती गावावर शोककळा पसरली.