
मारापूर : पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड गरजेची असा नारा सगळेच देऊ लागले आहेत. मात्र प्रत्यक्ष वृक्ष लागवड करून जोपासण्याकडे मात्र पाठ फिरवल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अशा परिस्थितीत वडीलाच्या निधनानंतर तिसऱ्या दिवसातील अस्थि विसर्जना ऐवजी वृक्ष लागवड करून जोपासण्याचा संकल्प मंगळवेढा तालुक्यातील मारापूर येथील बाळासाहेब यादव यांनी केला.