
सोलापूर : राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या (स्व.) विठाबाई नारायणगावकर यांच्या द्वितीय कन्या व ज्येष्ठ तमाशा कलावंत व फडमालक संध्या माने- सोलापूरकर (वय ७२) यांचे मंगळवारी दुपारी सोलापूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तमाशा कलावंत रोहन, सुरेश सोलापूरकर हे दोन पुत्र व एक विवाहित कन्या असा परिवार आहे.