सोलापूर : दुचाकीतील पेट्रोल संपल्याचा बहाणा करून विशाल धोडिंराम मदने (रा. २१, रा. माऊली चौक, माळशिरस) हा ट्रकमध्ये बसला. पुढे गेल्यावर त्याने चाकूचा धाक दाखवून चालकास ट्रकमधून खाली उतरवले. त्यानंतर ट्रक व त्यातील २१ लाखांचे लोखंडी ॲंगल चोरून नेल्याची फिर्याद शरीफ अहमद निसार अहमद (रा. मुंबई) यांनी अकलूज पोलिसांत दिली. पोलिसांनी पाठलाग करून त्याला जेरबंद केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी ठोठावली आहे.