
पंढरपूर : राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असताच आता पुरुषांवर देखील अत्याचार आणि अन्याय होऊ लागले आहेत. ही समाजाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाच्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष हक्क आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आज येथे केली.