

Tulaja bhavani tulajapu
sakal
सोलापूर,: श्री तुळजाभवानी देवीच्या मौल्यवान दागिन्यांसह ऐतिहासिक नाणी व वस्तूंच्या तपासणी प्रकरणात प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मंदिरातील सन २००१ ते २०१८ या कालावधीतील मौल्यवान सोने-चांदीचे दागिने, हिरे, मोती व प्राचीन अलंकारांच्या फेरफाराची चौकशी करण्यासाठी सादर करण्यात आलेला अहवाल त्रुटीपूर्ण व दिशाभूल करणारा असल्याचा दावा माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या निवेदनात केला आहे.