Crimesakal
सोलापूर
Bogus Notes : बनावट नोटा बाजारात वापरण्याच्या उद्देशाने घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक
बनावट नोटा बाजारात वापरण्याच्या उद्देशाने पंढरपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या दोघा संशयितांना टेंभुर्णी पोलीसांना सापळा रचून वेणेगांव चौकात पकडले.
टेंभुर्णी - बनावट नोटा बाजारात वापरण्याच्या उद्देशाने पंढरपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या दोघा संशयितांना टेंभुर्णी पोलीसांना सापळा रचून वेणेगांव चौकात पकडले. असून त्याच्याकडून 48 हजार 400 रूपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली असून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माढा न्यायालयात हजर केले असता दोन्ही संशयित आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.