

वैराग : मालेगाव (ता. बार्शी) येथे भिशीच्या पैशाच्या कारणावरून सुरेश लालासाहेब घोडके (वय ६०) यांना भरदिवसा काठीने लोखंडी रॉडने केलेल्या जबर मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी समाधान भारत घोडके (वय ३६) व जनाबाई भारत घोडके अशा दोघांविरुद्ध वैराग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना मालेगाव (ता. बार्शी) येथील समाज मंदिराजवळ बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली.