पुण्याहून गावी निघालेल्या चुलत भावंडांचा अपघाती मृत्यू

शनिवारी रात्री पुण्यात अपघाती मृत्यू झाला.
Rahul Desai and Pankaj Desai
Rahul Desai and Pankaj DesaiImages By Whats up

अक्कलकोट (सोलापूर) : केगांव बु (ता.अक्कलकोट) या गावात शेतकऱ्यांचे मोटार रिवाडींग करणाऱ्या इरप्पा देसाई यांचा मुलगा पंकज देसाई आणि शेतकरी सिद्धाराम देसाई यांचा एकुलता एक मुलगा राहुल देसाई यांचा शनिवारी रात्री पुण्यात अपघाती मृत्यू झाला. सोलापूर जिल्हा हा रोजगारांची कमतरता असलेला जिल्हा. या जिल्ह्यातील अनेक मुलं हाताला काम मिळाव या हेतूने आपल्या आई वडिलांना,आपल्या गावाला सोडून कामासाठी पुण्याला जातात. त्यातलीच पंकज देसाई (वय २७) आणि राहुल देसाई (वय २५) हे दोन तरुण महाराष्ट्रात कोरोना वाढत असल्याने शासनाने लॉकडाऊन जाहीर केला.

लॉकडाऊन पडल्याने पुण्यात काम करणाऱ्या या मुलांना कंपनीने सुट्ट्या दिल्या. कंपनी बंद, मेस बंद मग या मुलांनी करावं काय ? पर्याय एकचं लॉकडाऊन हटेपर्यंत आपल्या गावाकडे जावं. याचं पर्यायाचा विचार करून शनिवारी पंकज देसाई आणि राहुल देसाई हे तरुण कंपनीच्या कामावरून आल्यावर गावाकडं निघाली. पुण्यातून निघाल्यानंतर दोन तीन किमी पुढे आल्यानंतर लगेच मोटारसायकलला अपघात होऊन मृत झाले. आपल्या गावाकडे आई-वडिलांच्या बरोबर राहण्यास येणाऱ्या या दोन तरुण मुलांवर रात्री काळाने घाला घातला आणि ती कायमची आई वडिलांची कुशी सोडून देवाच्या कुशीत विसावली.

पंकज देसाई हा इरप्पा देसाईंचा मोठा मुलगा, मुलाच लग्न करावं म्हणून मोठ्या हौसेनी वडिलांनी गावात घर बांधले. दिवाळीत मुलाचं हात पिवळं करण्याचा आतच पंकज वडिलांना सोडून गेला, किती हे दुर्दैव ?. यापेक्षा मोठी दुर्दैव म्हणजे सिद्धाराम देसाई यांचा एकुलता एक मुलगा राहुल होता. पण यापूर्वीच पत्नीला देवाज्ञा आली होती. ज्याच्याकडे बघून आशेने जगावं तर तोच बापाचा हात अर्ध्यावर सोडून जगाचा निरोप घेतला. या अपघाताने गावकरी व नातेवाईक सुन्न झाले आहेत..केगांव मधील तरुणामध्ये नेहमी मिळून मिसळून वागणाऱ्या पंकज देसाई आणि राहुल देसाई या चुलत भावंडांच्या मृत्यूने अख्य गावं शोक सागरात बुडाली आहे, अशी माहिती मल्लीकार्जुन दरफळे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली आहे.

सर्व तरुण बैचेन झाली आहेत. पुण्यावरून निघताना घरच्यांशी आणि गावातील काहीं मित्रांशी या मुलांनी गावाकडे येत असल्याबद्दल रात्री फोन वरून संभाषण साधली होती. रात्री चांगल्या बोललेल्या मित्राची बातमी काही तासात अशी येईल असे वाटले नव्हते. लहान वयात अर्ध्यावर डाव मोडल्याने या हृदयद्रावक घटनेने मित्रमंडळीसह कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पंकज देसाई याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. तर राहुल देसाई याच्या पश्चात फक्त त्याचे वडील आणि दोन बहिणी आहेत. दरम्यान मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर आज सायंकाळी केगाव येथे आणून अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, अशी माहिती दारफळे यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com