सोलापूर ग्रामीणमध्ये 149 नवे कोरोनाबाधित दोघांचा मृत्यू 

corona
corona
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 2 हजार 292 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2 हजार 143 अहवाल निगेटिव्ह आले असून 149 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. एकाच दिवशी 145 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

ग्रामीण भागातील कोरोना चाचणीचे 51 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील 12 हजार 12 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. इन्स्टट्युन्शल क्वारंटाईनमध्ये तीन हजार 97 जण आहेत. ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता 35 हजार 889 झाली आहे. आतापर्यंत 1 हजार 47 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 1 हजार 634 ऍक्‍टिव्ह कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. 

ग्रामीण भागातील 33 हजार 208 जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. आजच्या अहवालांमध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये पंढरपूर तालुक्‍यातील पुळूजवाडी येथील साठ वर्षिय पुरुष व करमाळा तालुक्‍यातील मांगी येथील 75 वर्षिय पुरुष यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com