shashikant chopada and babulal chopada
sakal
मोहोळ - उजनी डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेले दोन फरशी बसविणारे कारागीर, पाण्यात बुडून वाहून गेले ते अध्यापही सापडले नाहीत. ही घटना शनिवार ता 16 रोजी दुपारी 2.30 वाजता ढोक बाभुळगाव, ता. मोहोळ येथील चौधरी वस्ती जवळील कालव्यात घडली. शशिकांत रोहिदास चोपडा (वय-26) व बाबुलाल हेमराज चोपडा (वय-20) दोघे रा. खेतडी, जिल्हा झुणझुण (राजस्थान) अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत.