सोलापूर जिल्ह्यात अडीचशे जातीचे पक्षी; निरीक्षणात नोंद 

Two hundred and fifty species of birds recorded in Solapur district
Two hundred and fifty species of birds recorded in Solapur district
Updated on

मोहोळ (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यात विविध पक्षांच्या सुमारे अडीशे जातीचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. मोहोळ तालुक्‍यात दोन प्रकारच्या पक्ष्यांचा आदिवास आहेत. त्यात माळरानावरचे पक्षी व जलसाठ्यावरील पक्षी यांचा समावेश आहे. तालुक्‍यात पक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा आष्टी तलाव असून याठिकाणी थंडीत दुरून येणाऱ्या पक्ष्यांचे संरक्षण झाले पाहिजे त्यांच्या शिकारीवर निर्बंध आणले पाहिजेत तरच पक्ष्यांच्या प्रजाती जिवंत राहणार असल्याची माहिती मोहोळ येथील पक्षी निरीक्षक डॉ. अविनाश राऊत दिली. 

गेल्या अनेक वर्षानंतर जिल्ह्यात प्रथमच पक्षी सप्ताह सुरू असून त्या संदर्भात डॉ. राऊत माहिती देत होते. प्रत्येक वर्षी हिवाळ्यात न चुकता स्थलांतरित पक्षी आपल्या भागात मोठ्या संखेने येतात. त्यात ग्रेटर फ्लेमिंगो, पेंटेड स्टार्क, व्हाईट स्टार्क, सीगल हेरॉन्स यासह अन्य प्रजातीचा समावेश आहे. मोहोळ तालुक्‍यात देवडी, पापरी, नजीक पिंपरी यासह अन्य ठिकाणी मोठी जंगले आहेत. या ठिकाणी दोन प्रकारच्या टिटवी, इंडियर कर्सर या सारखे कायमचे स्थायिक पक्षी आढळून येतात. तर मोंटेगु हरियर, पॅलीड हरियर, बोनाली इगल यासह अन्य पक्षी हे स्थलांतरित आहेत. 

पक्ष्यांचे मुख्य अन्न हे किडे, मुंग्या व कीटक असल्याने ते शेतकऱ्यांचे मित्र आहेत. त्यामुळे त्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. तर पक्षी हे नैसर्गिक कीटकनाशक असल्याने पिकावरील किडीचा नायनाट करतात. आष्टी तलावावर फ्लेमिंगोचे मोठ-मोठे थवे प्रत्येक वर्षी येतात. त्यामुळे त्या ठिकाणच्या पक्षी निरीक्षणासाठी टॉवर उभारणे गरजेचे आहे. तसेच पर्यटनाद्वारे अनेकांना उदरनिर्वाहाचे साधनही उपलब्ध होणार आहे. 
सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामीण व शहरी भागात आढळणाऱ्या चिमण्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. सिमेंटच्या बंगल्यामुळे चिमण्यांना घरट्यासाठी जागा मिळणे अवघड झाले आहे. स्थानिक झाडे लागवडीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यात वड, पिंपळ, आंबा, चिंच ही देशी झाडे लावावीत. जेणेकरून या झाडावर घरटी करून पक्षी या झाडांच्या फळावर उदरनिर्वाह करतील. विदेशी झाडे लावणे टाळावे तसेच प्रत्येकाने आपल्या घरासमोर चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी तयार करावीत, असे आवाहनही राऊत यांनी केले. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com