कोरोनाचा एक डोस दोनशे रुपयाला ! 30 वर्षांवरील व्यक्‍तींना 1 मार्चपासून लसीकरण

1vaccination_15.jpg
1vaccination_15.jpg
Updated on

सोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाचा दुसरा टप्पा शुक्रवारपासून (ता. 12) सुरु होणार आहे. त्याअंतर्गत फ्रंटलाईनवरील शासकीय कर्मचाऱ्यांना लस टोचली जाणार आहे. त्यानंतर 1 मार्चपासून 30 वर्षांवरील को-मॉर्बिड रुग्णांना लस टोचली जाणार असून त्यात राज्यभरातील साडेतीन कोटी तर सोलापूर शहर-जिल्ह्यातील साडेआठ लाख रुग्णांचा समावेश आहे. दोन डोससाठी प्रत्येकी दोनशे रुपयांचा खर्च येतो, असे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले. मात्र, पुढील टप्प्यात ही लस मोफत की पैसे देऊन दिली जाणार हे अद्याप निश्‍चित झालेले नाही.

को-मॉर्बिड रुग्णांना 1 मार्चपासून लसीकरण 
कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रत्येकांनी लस टोचून घ्यावी. आठवड्यातील प्रत्येकी शुक्रवारी आणि मंगळवारी लसीकरण केले जाणार असून त्यासाठी शहर-जिल्ह्यात 53 केंद्रांची निवड करण्यात आली आहे. 1 मार्चपासून को-मॉर्बिड रुग्णांना लस टोचण्याचे नियोजन आहे. 
- डॉ. बिरूदेव दुधभाते, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका 

राज्यातील कोरोनाचा संसर्ग हद्दपार करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावरील व्यक्‍तींनी लस टोचून घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. मात्र, अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेतली नाही, तर फ्रंटलाईनवरील अनेक कर्मचाऱ्यांनी नाव नोंदणीच केली नाही. लसीकरणाचे टप्पे लवकर पूर्ण करण्याच्या हेतूने आता सरकारी रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपजिल्हा रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण केले जाणार आहे. ज्या रुग्णांना हायपरटेन्शन, डायबेटिस, मेंदू, हृदय आणि किडनीचे आजार आहेत, अशा को-मॉर्बिड रुग्णांना तिसऱ्या टप्प्यात लस टोचली जाणार आहे. फ्रंटलाईनवरील कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्याचे लसीकरण सुरु केले जाणार आहे. या टप्प्यातील रुग्णांची संख्या मोठी असल्याने त्यांची ऑनलाइन नोंदणी केली जाणार नाही, अशी शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, संबंधितांकडे लस टोचताना आधार कार्ड असणे आवश्‍यक असेल, असेही सांगण्यात आले. कोरोना झालेल्यांना नव्हे, तर कोरोना होऊ नये, म्हणून लस टोचली जात असल्याचेही आरोग्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

सोलापूरची स्थिती 
एकूण लसीकरण केंद्रे 
53 
30 वर्षांवरील को-मॉर्बिड 
8.60 लाख 
शहरातील को-मॉर्बिड 
1.08 लाख 
आठवड्यातील लसीकरणाचे दिवस 
2

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Milk Rate
Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Marathi News Esakal
www.esakal.com