लग्नपत्रिका देण्यासाठी गेल्या नातु व आजोंबाचा अपघातात मृत्यू 

Two killed in a bike acciden
Two killed in a bike acciden
Updated on

कुर्डू (सोलापूर ) : भावाच्या लग्नाच्या पत्रिका वाटून घराकडे परतत असताना कुर्डू (ता. माढा) येथे पिकअप व दुचाकीच्या अपघातामध्ये नातु व आजोबा जागीच ठार झाले. ही घटना रविवारी (ता. 2) आडीच वाजताच्या सुमारास घडली आहे. अभिजित रमेश मोरे (वय 22, रा. कन्हेरगाव) व महादेव नामदेव डांगे (वय 65, रा. पिंपळनेर (डोणवाडी), ता. माढा) अशी मृतांची नावे आहेत. 
पिकअप कुर्डूवाडीकडे व दुचाकी टेंभुर्णीच्या दिशेने जात होती. कुर्डूवाडी- टेंभुर्णी रोडवर कुर्डूहद्दीत झुंडरे यांच्या वस्तीजवळ या दोन वाहनाची जोराची धडक झाली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अभिजितचा थोरला भाऊ किशोरचे 14 फेब्रुवारीला लग्न आहे. त्याच्या लग्नपत्रिका वाटण्यासाठी अजोबा महादेव नामदेव डांगे व नातू अभिजित हे दोघं मिळून गेले होते. परत येत असताना कुर्डूजवळ त्यांच्यावर काळाने घाला घातला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
farmer loan waiver scheme issue
Marathi News Esakal
www.esakal.com