
सोलापूर : बेंगळुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस (१२६२७) या रेल्वेमध्ये सोलापूर ते मनमाड दरम्यान सोलापूर रेल्वे विभागातील प्रवासी तिकीट निरीक्षक (टीटीआय) संतोष कुमार यांना दोन अल्पवयीन मुली रडत असल्याचे एका प्रवाशांने सांगितले. संतोष कुमार यांनी त्या अल्पवयीन मुलींशी संपर्क साधत रेल्वे पोलिसांच्या मदतीने पालकांच्या स्वाधीन केले.