कोरोना : सांगोल्यातील दोन रुग्ण सोलापूरला पाठविले

Two patients send from Sangola to Solapur
Two patients send from Sangola to Solapur
Updated on

सांगोला (सोलापूर)  : सांगोला तालुक्‍यातील कोरोनाचे दोन संशयित रुग्ण पुढील उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठविले आहेत. देशात संचारबंदी लागू केली असली तरी अद्याप नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत. शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन तहसीलदार योगेश खरमाटे यांनी केले आहे. कोरोनाच्या संशयित रुग्णामुळे तालुक्‍यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
सांगोला तालुक्‍यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. पुण्याहून आलेल्या दोन कोरोना संशयित रुग्णांना आज पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले आहेत. सध्या तालुक्‍यात एक हजार 854 नागरिक अन्य ठिकाणाहून आले असून यापैकी तिघांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. आतापर्यंत अन्य देशातून 11, अन्य राज्यातून 107 तर अन्य जिल्ह्यातून सहा हजार 447 नागरिक दाखल झाले आहेत. त्यापैकी तिघांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. आज दोन संशयित रुग्णांना सोलापूर येथे पुढील उपचारासाठी पाठविले आहेत. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सांगोला तालुक्‍यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून ग्रामीण रुग्णालयात 10 बेड तर सिंहगड कॉलेज येथे 40 बेडची सोय करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी एक डॉक्‍टर, एक सहायक, एक शिपाई अशा तिघांची तीन-तीन पथके सज्ज असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी सीमा दोडमणी यांनी दिली आहे. नागरिकांनी घराशेजारी अन्य ठिकाणाहून कोण नवीन व्यक्‍ती आल्यास त्याची माहिती प्रशासनाकडे देऊन सहकार्य करावे. महत्त्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार योगेश खरमाटे यांनी केले आहे. 

सीमेवर भीतीचे वातावरण 
सध्या जिल्हाबंदी असताना सांगली जिल्ह्यातून काही नागरिक चालत किंवा अन्य वाहनांतून तालुक्‍यात येत आहेत. अशा नागरिकांमुळे सीमेशेजार असलेल्या गावांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Railway Project
Solapur ZP School
Marathi News Esakal
www.esakal.com