ब्रेकिंग न्यूज! सोलापूर ग्रामीण मुख्यालयातील दोन पोलिसांना कोरोनाची लागण

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर ग्रामीण मुख्यालयातील दोन पोलिसांना कोरोनाची लागण
Updated on

सोलापूर : कोरोनाच्या वैश्विक संकटाला हद्दपार करण्यासाठी राज्यभर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या 210 पैकी तब्बल 180 मार्ग बंद करून त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावला आहे. दरम्यान, शनिवारी (ता. 2) ग्रामीण भागात बंदोबस्त देणाऱ्या व शहरातील पोलीस मुख्यालयात राहणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार शहर पोलिस मुख्यालयाच्या शेजारील ग्रामीण मुख्यालयाचा भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे.

आतापर्यंत सोलापुरात सापडलेल्या 111 रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील दोनच रुग्ण आहेत. सांगोला तालुक्यातील घेरडी तर मोहोळ तालुक्यातील पाटकुल याठिकाणी कोरोनाचे दोन रुग्ण सापडले आहेत. उर्वरित तालुक्यांमध्ये अद्यापही कोरोना बाधित रुग्ण सापडला नाही. परंतु, ग्रामीण मुख्यालयात राहणाऱ्या या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त नेमका कुठे होता, त्यांना कोणत्या ठिकाणी, कोणाच्या संपर्कातून कोरोना झाला, याचा तपास आता युद्ध पातळीवर सुरु झाला आहे.

राज्यभरात सुमारे तीनशेहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून सोलापूर शहर जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी व अधिकारी कोरोना शपासून चार हात लांब होते. मात्र, शनिवारी ग्रामीण मुख्यालयात राहणारे दोन पोलीस कर्मचारी कोरून पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ माजली आहे. ते दोन पोलीस कर्मचारी कोणत्या ठिकाणी बंदोबस्तासाठी होते याची माहिती तूर्तास मिळू शकली नाही. यासंदर्भात पोलिस अधीक्षक मनोज पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mega Farmers' Gathering in Mohol: BJP Gears Up to Strengthen Local Roots
Solapur Farmers’ Crisis: Congress Demands Restoration of Electricity in Bhima River Belt
Fula film
madar film
Marathi News Esakal
www.esakal.com