
पांगरी : बार्शी ते कुसळंब रस्त्यावर कुसळंब गावाजवळ सोमवारी (ता. १६) सायंकाळी साडेचारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. उपळाई (ता. कळंब) येथील नानासाहेब अप्पाराव शेंडगे (वय ६१) व विनायक हरिदास मुंढे (वय ७१) हे दोघे मोटारसायकलने प्रवास करत असताना त्यांना समोरून भरधाव वेगात आलेल्या टिप्परने जबर धडक दिली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला.