सोलापूर शहरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bike thief
सोलापूर शहरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट

सोलापूर शहरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट

सोलापूर : शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची(cctv cameras) संख्या वाढवावी, असे निर्देश गृहराज्यमंत्री सतेज पाटील(minister satej patil) यांनी काही महिन्यांपूर्वी दिले होते. तरीही, त्यानुसार कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे अनेक गुन्ह्यांमधील(crime in solapur) चोरटे मोकाट असल्याची स्थिती आहे. नवीन आयुक्‍तांच्या कार्यकाळात नववर्षात चोरी, घरफोडी, दुचाकी चोरी कमी होईल, अशी आशा होती. मात्र, मागील आठ दिवसांत सहा दुचाकी, एक मोबाइल, दोन पर्स आणि साडेचार लाखांचे दागिने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

हेही वाचा: विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नका! शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद

बंद घर अथवा दरवाजा उघडा असलेल्या घरांवर चोरट्यांनी वॉच ठेवून डल्ला मारायला सुरवात केली आहे. १ जानेवारीला चोरट्याने विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शांती अपार्टमेंटमध्ये घरफोडी करून २० हजारांचे दागिने लंपास केले. त्यानंतर ३ जानेवारीला चोरट्याने शहरातील जुनी फौजदार चावडी परिसरातील एका दवाखान्यात उपचारासाठी गेलेल्या महिलेचे पर्सच पळविले. त्याच दिवशी फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भवानी पेठेतून चोरट्याने दुचाकी चोरून नेली. दहिटणे रोडवरील शेळगी येथील एका फरसाणचे दुकान फोडून चोरट्याने दुकानातून सात हजारांची रोकड पळविली.

हेही वाचा: सोलापूर : विधवा सुनेचे केलं कन्यादान! शिक्षक दाम्पत्यानं घालून दिला आदर्श

मागील अनुभव पाहून नवीन पोलिस आयुक्‍त शहरातील चोरी, घरफोडी रोखण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करतील, असा विश्‍वास नागरिकांमध्ये बळावला. मात्र, चोरीचा सिलसिला सुरुच आहे. ५ जानेवारीला चोरट्याने जोडभावी पेठ हद्दीतील हनुमान नगरात घरफोडी करून एक लाख २० हजारांचे दागिने चोरून नेले. त्याच परिसरातून एक छोटा हत्ती वाहनही चोरीला गेल्याचे समोर आले. तर ८ जानेवारीला शेळगी येथून चोरट्याने वीजेच्या ताराच पळविल्या. त्याच दिवशी मार्केट यार्ड परिसरातून भाजी खरेदी करताना चोरट्याने एका महिलेची पर्स पळविली. म्हेत्रे नगरातून चोरट्याने घरफोडी करून एक लाख ६९ हजार ६०० रुपयांचे दागिने चोरून नेल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलिसांत त्या दिवशी दाखल झाला

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top