Shivsena : अखेर उद्धव ठाकरेंनी भाजपला हरवलंच; चिंचपूर ग्रामपंचायतीवर सेनेचा झेंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

अखेर उद्धव ठाकरेंनी भाजपला हरवलंच; चिंचपूर ग्रामपंचायतीवर सेनेचा झेंडा

Solapur Chichpur Grampanchayat Election : बंडखोरी करून सत्तेतून पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी या घटनेचा अखेर बदला घेतला असून, सोलापूरमधील चिंचपूर ग्रामपंचायतीमध्ये उद्धव ठाकरे गटाने सर्वच्या सर्व 7 जागांवर विजय मिळवत भाजपचा पराभव केला आहे. ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकल्याने ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या निकालाने सोलापुरात वर्चस्व असणारे माजी सहकारमंत्री आणि भाजपा आमदार सुभाष देशमुख हा मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा: Video : काँग्रेसमध्ये लोकशाही आहे का? राहुल गांधींच्या घणाघाताला भाजपचं प्रत्युत्तर

सोलापूरमध्ये सुभाष देशमुख यांचे वर्चस्व आहे. मात्र आज जाहीर झालेल्या चिचंपूर ग्रामपंचायतीच्या निकालाने भाजपसह देशमुखांना मोठा धक्का बसल्याची चर्चा असून, बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी मिळवलेले हे पहिलेच यश आहे. राज्यात आज 15 जिल्ह्यातील 238 ग्रामपंचायतीचे निकाल लागणार असून या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

हेही वाचा: Social Viral : सौंदर्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 5 पोलिसांची बदली, वाचा संपूर्ण प्रकरण

सोलापूर जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीचे निकाल लागणार असून, पहिल्या निकालात चिंचपूर ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाने विजय सुरुवात करत भाजपला जोरदार धक्का दिला आहे. चिंचपूरच्या निकालानंतर आता उर्वरित ग्रामपंचायीत कुणाची सत्ता येणार याची उत्सुकता सर्व राजकीय पक्षांना लागली आहे.

Web Title: Uddhav Thackerya Group Win All Seven Seat Of Chichpur Grampanchayat Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..