
केत्तूर : उजनी जलाशयाने वजा पातळी गाठल्याने जलाशयातील सर्वच पाणथळ जागा रिकाम्या झालेल्या आहेत. त्यामुळे देशी, विदेशी पक्ष्यांना खाद्य सहज उपलब्ध होत असल्याने उजनी जलाशयावर विविध पक्षांची गर्दी वाढू लागली आहे. यामध्ये रंगीत कोरकोच्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.