उजनी आले 65 टक्‍यांवर 

उजनी आले 65 टक्‍यांवर 
Updated on

सोलापूर ः जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाल्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठा अद्यापही समाधानकारक स्थितीत आहे. आजअखेर धरणात 65 टक्के इतका पाणीसाठा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा जवळपास 58 टक्‍यांनी जास्त आहे. या पाण्याचा वापर निश्‍चितच शेतीसाठी योग्य पद्धतीने करता येणे शक्‍य होणार आहे. 

जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाकडे पुणेसह नगर जिल्ह्याचेही लक्ष लागलेले असते. मागील वर्षीच्या चांगल्या पावसामुळे धरणात समाधानकारक पाणीसाठा आहे. धरणातून कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. साधारणपणे एक महिनाभर हे आवर्तन चालण्याची शक्‍यता आहे. सध्या कालव्याद्वारे सोडलेल्या पाण्याचा वेग कमी आहे. मात्र, जसजशी शेतकऱ्यांची मागणी वाढत जाईल, त्यानुसार पाणी सोडण्याचा वेगही वाढविला जाण्याची शक्‍यता आहे. नुकतेच धरणातून सोलापूर शहरासाठी पिण्यास पाणी सोडण्यात आले होते. मागील आठवड्यात जिल्ह्यात काही प्रमाणात अवकाळी पाऊसही झाला. त्यावेळी आवर्तन लांबणार का? असा प्रश्‍न पडला होता. मात्र, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने ठरल्यानुसार कालव्याद्वारे पाणी सोडण्यास सुरवात केली आहे. मात्र, पाण्याचा वेग कमी ठेवला आहे. सध्या मुख्य कालव्यातून दीड हजार क्‍सुसेकने पाणी सोडले जात आहे. याशिवाय बोगद्यातूनही 200 क्‍सुसेकने पाणी सोडणे सुरू ठेवले आहे. नदीद्वारे सोडण्यात येणारे पाणी बंद केल्यानंतर कालव्यातून पाणी सोडणे सुरू केले आहे. मागील वर्षी पुण्यासह सोलापूर जिल्ह्यातही चांगला पाऊस झाल्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात भीमा नदीमार्गे पाणी सोडून देण्यात आले होते. त्यामुळे भीमा नदीकाठी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. चांगला पाऊस झाल्यामुळे धरणातील पाण्याचा वापरही योग्य पद्धतीने केला गेला आहे. त्यामुळेच आज धरणात समाधानकारक पाणीसाठा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

उजनी धरण
star air
Solapur sucide
Ashadhi Wari return traffic jam on Kurduwadi Barshi road at Ridhore Seena river bridge affecting ST buses and devotees in Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com