
मंगळवेढा : उजनी कालव्यातून पुरेशा दाबाने सोडत नसल्यामुळे संतप्त शेतकय्रांनी मरवडे येथे महामार्गावर केलेल्या आंदोलनामुळे उजनी कालवा व्यवस्थापाने आज सकाळपासून पुरेशा दाबाने पाणी सोडल्याने जळीत पिकाला जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असतानाच दरम्यान पूर्व सूचना न देता आंदोलन केल्याप्रकरणी बारा शेतकरी आंदोलकावर गुन्हा दाखल करण्यात आला.