World Tourism Day 2021 :‘उजनी’तील पक्ष्यांचे होणार टॅगिंग

स्थलातंरीत पक्ष्यांचा उलघडणार प्रवास व अधिवास
World Tourism Day 2021 :‘उजनी’तील पक्ष्यांचे होणार टॅगिंग
World Tourism Day 2021 :‘उजनी’तील पक्ष्यांचे होणार टॅगिंग

सोलापूर : उजनीसह राज्यातील सहा प्रमुख जलशयातील पाणथळ जागेत येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचा प्रवास व अधिवास स्पष्ट होण्यासाठी पक्ष्यांना रिंगिग व टॅगिंग करण्यात येणार आहे. यासाठी वन खाते व बीएनएचएच (बाँबे नॅचरल ट्रस्टी सोसायटी) हे एकत्रित काम करत आहेत.

भारातात सुमारे ३७० प्रजातीचे पक्षी हंगामी स्थलांतर करतात. हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी महराष्ट्रातील विविध पाणथळ जागेत अनेक दिवसांचा मुक्काम करातात. यातील निवडक ५०० पक्ष्यांना टॅगिंग करण्यात येणार आहे. विविध प्रजातींच्या पक्ष्यांचे संवर्धन आणि सुरक्षेसाठी व भविष्यकालीन धोरण तयार करता यावे, यासाठी हे पाऊल उचलले असून उजनी धरणावरील पाणथळ जागेतील पक्ष्यांचाही यात समावेश आहे.

उजनी धरण हे जैविक विविधतेने अत्यंत संपन्न क्षेत्र आहे. या ठिकाणी अनेक प्रकारच्या स्थलांतरीत पक्ष्यांबरोबरच प्राणी व फुलपाखरे तसेच उभयचर प्राणी यांचे वास्तव्य आहे. अनेक दुर्मिळ वनस्पतींनी हे क्षेत्र नटलेले आहे. या ठिकणी कोल्हा, लांडगा, तरस, हरीण हे सहजासहजी दृष्टीस पडते. या ठिकाणचे पक्षी वैभव पाहण्यासारखे आहे. यासाठी वन विभागाकडून या जागेवरील जैविक संवर्धनाबरोबरच या ठिकाणी भौतिक सुविधांही उपलब्ध करण्यात येणार आहेत. पक्षी निरिक्षणसाठी मनोरे व पर्यटकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था याठिकाणी विकसित केल्यानंतर उजनी हे ठिकाण पक्षी अभ्यासाकांची पंढरी म्हणून भविष्यात नावारुपाला येणार आहे.

काय आहे रिगिंग व टॅगिंग

निवडक पाचशे पक्ष्यांच्या पायात एक विशिष्ट रिंग बसवली जाते. या रिंगमधील डिजिटल टॅगमुळे पक्ष्यांचा प्रवास व आदिवास याची माहिती संकलित होते. यामुळे बदल व मार्गातील समस्या यांचा अभ्यास करून पक्ष्यांच्या संवर्धनासाठीचे धोरण ठरविले जाते. यासाठी बीएनएचएच (बाँबे नॅचरल ट्रस्टी सोसायटी) ही बिगर सहकारी संस्था व वनखाते एकत्रित काम करत आहेत. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना बीएनएचएच ही संस्था प्रशिक्षण देणार असून रिगिंग व टॅगिंग करण्यासाठी बीएनएचएचला परवानगी मिळालेली आहे.

ठळक बाबी

  • जायकवाडी पक्षी अभयारण्य (औरंगाबाद), गंगापूर धरण, नांदूर मधमेश्‍वर अभयारण्य (नाशिक), हतनूर धरण (भुसावळ- जळगाव), इसापूर - धरण (हिंगोली- यवतमाळ), उजनी धरण (सोलापूर) या ठिकाणी मोहीम

  • उजनीच्या पाणथळ जागे पक्षी निरिक्षण मनोऱ्यासह पर्याटकासाठी सुविधा प्रस्तावित

  • पाणथळ जागेच्या संवर्धानबराबरच पक्षी वैभवात पडणार भर

  • पाणथळपक्षी, कुरव, सुरय, क्रौंच, करकोचा, बदके, राजहंस, फ्लेमिंगो आदी पक्ष्यांचा समावेश

मध्य आशियामार्गे भारातात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. यावरून राष्ट्रीय कृती आराखडा बनवला जाईल. उजनीच्या समृद्ध जैव विविधतेच्या संवर्धनबरोबरच येथील पक्षी वैभव जगासमोर येण्यासाठी या मोहिमेचा निश्‍चितच फायदा होईल.

- रमेशकुमार, वनसंरक्षक, (वन्यजीव) पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com