
इंदापूर : पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांसाठी जीवनदायिनी मानलं जाणारं उजनी धरण शनिवार (ता.09) रोजी रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर दुपारी 100 टक्के क्षमतेने भरलं आहे. पाटबंधारे विभागाने (9 ऑगस्ट) सकाळी सहा वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार, धरणातील पाणीसाठा 116.99 टीएमसीवर पोहोचला होता. टक्केवारीत 99.56 टक्के होता.117 टीएमसी पाणीसाठ्यावर उजनी धरण पूर्ण क्षमतेला पोहोचते. दुपारी तो टप्पा पार करीत उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.