उजनी मायनसच्या उंबरठ्यावर; ५० दिवसांत संपले ३० TMC पाणी; आता पाणी पिण्यासाठीच राखीव

उजनी धरण आता तळ गाठू लागले आहे. ५० दिवसांत तब्बल ३० टीएमसी पाणी संपले आहे. मागील दोन महिन्यांपासून कॅनॉल, बोगदा, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडणे सुरुच आहे. गतवर्षी १२ जूनला मायनसमध्ये गेलेले धरण यंदा ६ मेपूर्वीच मानयसमध्ये जाणार आहे.
उजनी धरण
उजनी धरण Gallery
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असणारे उजनी धरण आता तळ गाठू लागले आहे. ५० दिवसांत तब्बल ३० टीएमसी पाणी संपले आहे. मागील दोन महिन्यांपासून कॅनॉल, बोगदा, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडणे सुरुच आहे. गतवर्षी १२ जूनला मायनसमध्ये गेलेले धरण यंदा ६ मेपूर्वीच मानयसमध्ये जाणार आहे. त्यामुळे ६ मे ते पाऊस सुरु होईपर्यंत जिल्ह्याला पाणी टंचाईच्या छळा सोसाव्या लागतील, अशी सद्य:स्थिती असून तसा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

उजनी धरणात १२० टीएमसीपर्यंत पाणी साठा होण्याची मर्यादा आहे. पण, सध्या २० ते २२ टीएमसीपर्यंत गाळ आहे. त्यामुळे धरण मायनसमध्ये गेल्यानंतर धरणात ६४ टीएमसी पाणीसाठा राहील. त्यापैकी ४० ते ४४ टीएमसीच पाणी असणार आहे.

दरम्यान, २०१८-१९ मध्ये धरणातील मायनस २७ ते २८ टीएमसीपर्यंत पाणी वापरले होते. यंदाही तशीच वेळ येईल,असा अंदाज वर्तवला जात आहे. तरीपण, १५ जूनपर्यंत पाऊस सुरु झाल्यास मृत साठ्यातील १० ते १५ टीएमसीपर्यंत पाणी वापरावे लागणार आहे. सध्या सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ४३३ क्युसेक, बोगद्यातून ७१० क्युसेक व कॅनॉलमधून तीन हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे दररोज अर्धा टीएमसी पाणी संपत असून त्यात पुन्हा बाष्पीभवनाचाही फटका बसत आहे. त्यामुळे ६ मेपर्यंत धरण मायनसमध्ये जाईल, असा अंदाज धरणावरील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सध्या धरणात जीवंतसाठा ६.८३ टीएमसी (१३ टक्के) पाणी आहे.

...तर धरणामधील पाणीसाठा पिण्यासाठीच राखीव

बोगदा व उपसा सिंचन योजनेतून सोडले जाणाऱ्या पाण्याचा विसर्ग सध्या पाणीपातळी घटत असल्याने कमी होऊ लागला आहे. साधारणत: १० मेपर्यंत कॅनॉलचे पाणी राहणार आहे. त्यानंतर बोगदा, कॅनॉल व उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडता येणार नाही. सोलापूर शहराला मे महिन्यात एकदा नदीतून पाणी सोडले जाईल. त्यानंतर मात्र, धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे.

तुलनेत एक महिना अगोदरच धरण मायनसमध्ये

गेल्यावर्षी पावसाळा साधारणतः: १५ ते २० जूनपासून सुरु झाला होता. त्यावेळी धरण १२ जूनपर्यंत प्लसमध्येच होते. त्यानंतर धरणातील पाणीसाठा काही दिवस मायनसमध्ये राहिला. पण, यंदा ६ मेपासून धरण मायनसमध्ये जाईल, अशी स्थिती आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ३६ दिवसांपूर्वीच धरण मायनसमध्ये जाणार असल्याने टॅंकरमुक्त जिल्ह्यात काही ठिकाणी टॅंकरची गरज भासेल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com