जमिनी क्षारपड थांबवण्यासाठी भूमिगत चर योजना राबवावी - आ. अवताडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Samadhan avtade

मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील जमीनी क्षारपट झाल्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना स्थलांतरित व्हावे लागणार.

Mangalwedha News : जमिनी क्षारपड थांबवण्यासाठी भूमिगत चर योजना राबवावी - आ. अवताडे

मंगळवेढा - मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील जमीनी क्षारपट झाल्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना स्थलांतरित व्हावे लागणार असल्याने या जमिनी क्षारपड होण्यापासून थांबवण्यासाठी भूमिगत चर योजना राबवण्याबाबतचा प्रश्न आ. समाधान अवताडे यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला.

आज आ. आवताडे त्यांनी मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्यातील रहाटेवाडी तामदर्डी या परिसरा बरोबर पंढरपूर तालुक्यातील कौठाळी या भागात जमिनी पाण्याच्या अतिवापरामुळे क्षारपड झाल्या आहेत. भविष्यात शासनाने याकडे दुर्लक्ष केले असता, या गावाचे पुनर्वसन करावे लागेल आणि यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे भूमीहीन व्हावे भूमीन व्हावे लागेल. 2019- 20 साली याबाबत सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणातून ज्या गोष्टी समोर आल्या त्याबाबतच्या उपाययोजना केल्या नसल्याने त्यांनी आज प्रश्न उपस्थित करत सांगली जिल्ह्यात राबवलेली भूमिगत चर योजना या मतदारसंघात राबवणार काय?

शिवाय क्षारपड जमिनी आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न काय करणार? व रासायनिक खता ऐवजी सेंद्रिय खताचा वापर करण्याबाबत प्रबोधन करणार काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सध्याच्या गेल्या तीन वर्षात क्षारपड जमिनीमध्ये 57 हेक्टर इतकी वाढ झाली यात लक्ष देण्यासारखी परिस्थिती असून रासायनिक खताचा वापर अजून अटोक्यात आहे.

सेंद्रिय खताचा वापर करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल 25 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेती खाली कसे आणता येईल याबाबत शासनाच्या प्रयत्न करीत आहे. व सांगली जिल्ह्यातील पाच गावात भूमिगत चर योजना राबविण्यात आली. ही योजना यशस्वी ठरल्यानंतर त्याचे मूल्यमापन करून त्याची अंमलबजावणी या मतदारसंघात करण्यात येईल असे आ. अवताडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना जलसंपदा मंत्री फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :mangalwedhaMLASoilLands