अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडेंच्या आठवणीतील तपास !

अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडेंच्या आठवणीतील तपास!
अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडेंच्या आठवणीतील तपास!
अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडेंच्या आठवणीतील तपास!Canva
Summary

अतुल झेंडे म्हणाले, अनैतिक संबंधातून पुण्यातील तरुणाचा खून अन्‌ माढ्यातील म्हातारीच्या बांगड्यांची चोरी या गुन्ह्यांचा तपास माझ्या आठवणीत राहतील.

सोलापूर : पुण्यातील (Pune) एका तरुणाचा अनैतिक संबंधातून खून (Crime) करण्यात आला होता. त्याचा मृतदेह पंढरपूर (Pandharpur) परिसरातील कॅनॉलमधून वाहत आले होते. त्याची ओळख पटत नव्हती. 2019 मधील गुन्ह्यातील मृताची ओळख वर्षानंतर पटली आणि पुढे यशस्वी तपास केला. माढा येथील एका वयस्क महिलेच्या घरातील सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्या होत्या. त्या महिलेची बांगड्यांशी जवळीकता होती. त्यामुळे त्या बांगड्या चोरट्याकडून परत देता आल्या, हे दोन्ही तपास कायम लक्षात राहतील, अशी आठवण अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे (Upper Superintendent of Police Atul Zende) यांनी सांगितली.

अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडेंच्या आठवणीतील तपास!
अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे ठरले 'रिअल सिंघम'

सोलापूर ग्रामीणमधून आता अतुल झेंडे यांची रायगड येथे बदली झाली आहे. पदभार सोडून जाताना त्यांनी "सकाळ' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, त्यांनी ग्रामीण पोलिस दलात काम करताना आलेले अनुभव सांगितले. जिल्ह्यात दरवर्षी सात ते साडेसात हजारांवर गुन्हे दाखल होतात. शेतीच्या वादातून दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. दुसरीकडे अपघाती मृत्यूचे प्रमाणही अधिक असल्याचे ते म्हणाले. गुन्हेगारी कमी व्हावी म्हणून अधिकारी, अंमलदार सतत प्रयत्न करतात. तत्कालीन पोलिस अधीक्षक मनोज पाटील व आताच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासोबत काम करताना खूप चांगले अनुभव आल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. सातपुते यांच्या "ऑपरेशन परिवर्तन'चेही त्यांनी कौतुक केले.

संस्मरणीय असतील ते दोन गुन्हे

2019 मध्ये पंढरपूर परिसरात कॅनॉलमधून एका पुरुषाचा मृतदेह वाहत आला होता. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची ओळख पटत नव्हती. वर्षानंतर त्याची ओळख पटली. पुण्यातील एका पोलिस ठाण्यात त्या वयोगटातील व्यक्‍ती बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर संबंधित नातेवाइकांना बोलावून खात्री केली आणि तीच व्यक्‍ती असल्याचे समोर आले. फेब्रुवारी 2021 मध्ये त्याचा तपास लागला. अनैतिक संबंधातून त्याच्याच जवळच्या व्यक्‍तींनी त्याचा खून केल्याचे उघड झाले. दुसऱ्या घटनेत मी एकदा माढ्याला गेलो होतो. त्यावेळी एक 85 वर्षीय महिला पोलिस ठाण्यासमोर थांबली होती. त्याबद्दल चौकशी केल्यानंतर तिच्या घरातून सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याचे समजले. त्या वयस्क महिलेने सांभाळलेल्या त्या बांगड्या परत मिळाव्यात म्हणून पाठपुरावा करून चौकशी अधिकाऱ्याला सूचना केल्या. काही दिवसांनी त्या महिलेच्या गल्लीतील एका ओळखीच्या तरुणाने चोरी केल्याचे समोर आले. त्या महिलेच्या चोरीच्या बांगड्या सोनाराने वितळविल्या नव्हत्या. त्यामुळे त्या बांगड्या महिलेला परत करता आल्या. या दोन्ही घटना माझ्या संस्मरणात राहतील, असेही झेंडे यांनी यावेळी सांगितले.

अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडेंच्या आठवणीतील तपास!
वडिलांनी ज्यूस बार चालविले, पण मुलाला 'आयपीएस' बनविलेच!

पंतप्रधानांच्या सभेतील बंदोबस्ताचा पॅटर्न देशभर

मागील लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकलूज येथे मोठी सभा झाली. त्यावेळी केंद्रीय सुरक्षा दलाच्या निर्देशानुसार सभेच्या ठिकाणी मतदारांची बैठक व्यवस्था, त्यांचे चेकिंग करण्यापासून हेलिपॅड, सभेच्या ठिकाणी चोख व नियोजनबद्ध बंदोबस्त लावला होता. केंद्रीय पथकानेही त्याचे कौतुक केले. सभेच्या बंदोबस्ताचा अकलूज पॅटर्न राज्यभर, देशभर पोचल्याची आठवण अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी "सकाळ' कार्यालयातील संवादावेळी कथन केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com