
Solapur: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (ता. २५) सोलापूरकरांना प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या गायनात वारसा व नव्या शैलीचा असलेला संगम ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ या भव्य लाईव्ह कॉन्सर्टद्वारे अनुभवता येणार आहे. एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी प्रस्तुत व ‘सकाळ माध्यम समूह’ आयोजित ही सुरांची पर्वणी सोलापूरकरांना मिळणार आहे. कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीस सोलापूरकरांनी विक्रमी प्रतिसाद दिला आहे.